Kalyan Murder Case Fadnavis Reaction: कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या विशाल गवळीकडे तो मानसिक रुग्ण असल्याचा दाखला पोलिसांना तपासात आढळून आल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. दरम्यान विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांनाही अटक करण्यात आली असून आज कल्याण सत्र न्यायालयाने त्यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान काल MEET THE PRESS या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमनातरी व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आयुक्तांना कोणते आदेश दिलेत व अशा घटना टाळण्यासाठी सरकार काय पाऊले उचलणार आहे याबाबत वक्तव्य केलं आहे.