Pune Police Sexually Molest Minor Girl: आरोपी सचिन सस्ते हा पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. बुधवारी नाताळ सणानिमित्त पर्यटकांची विसापूर किल्ल्यावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी ड्युटी लावण्यात आली होती. किल्ल्याच्या पायथ्याशी पीडित चिमुकलीचे घर आहे. पिडीत कुटुंबासह राहते. त्याच कुटुंबाने नराधम सचिन सस्तेला जेवायला दिलं. जेवणाचं बिल देत असताना चिमुकळीवर त्याची नजर पडली. खेळत असलेल्या चिमुकलीसोबत त्याने अश्लील चाळे केले. याबाबत ची माहिती चिमुकलीने आई ला दिली मग ही घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित सचिन सस्तेला अटक केली आहे.