Kalyan Murder Case DCP Atul Zende On Action Mode: कल्याण, डोंबिवली शहरांमधील वाढती गुन्हेगारी, गर्दुल्ल्यांचा वाढता उपद्रव पाहून आता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनीच रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री कल्याण शहराच्या विविध भागात उघड्यावर गांजा, मद्य, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दहा तळीरामांना पोलिसांनी पकडले. या तळीरामांना उपायुक्त झेंडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर उपायुक्त झेंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत तळीरामांना पोलीस खाक्या दाखवत खरडपट्टी काढली.