PM Narendra Modi on Formar PM Manmohan Singh: अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत झालेल्या चर्चेत राज्यसभेत बोलताना मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार काढले होते. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्याच. २६ डिसेंबर २०२४ ला देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यावर मोदींनी त्यावेळेस केलेल्या त्यांच्या कौतुकाचा क्षण व्हायरल होत आहे.