Formar PM Manmohan Singh vs Sushma Swaraj Shayari: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काही वेळापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत दोनवेळा पंतप्रधान होते. आज त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातला तारा निखळल्याची भावना लोकांच्या मनात आहे. दरम्यान त्यांच्या आणि सुषमा स्वराज यांच्या शेरोशायरीची आठवणही सगळ्यांना झाली आहे.