PM Modi, HM Amit Shah pay last respects to former PM Dr Manmohan Singh: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. आज माजी पंतप्रधानांच्या निधनानंतर स्वतः विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी श्रद्धांजली अर्पण केली.