India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away: २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांचं अमेरिकन संसदेसमोर झालेलं भाषण विशेष चर्चेत राहिलं. यावेळी त्यांना मिळालेल्या स्टँडिंग ओवेशनचीही चर्चा झाली. मात्र, त्याहीवेळी मनमोहन सिंग यांना अशाच प्रकारे मिळालेल्या स्टँडिंग ओवेशनचे दाखले सोशल मीडियावर दिले गेले. डॉ. मनमोहन सिंग २००५ साली अमेरिका दौऱ्यावर गेले होते. हा दौरा फक्त दिल्लीच नव्हे, फक्त भारतच नव्हे, तर अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरला होता.