भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी (२६ डिसेंबर) वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या काही जुन्या आठवणी जागवत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.