भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळासोबतच कलाविश्व व अर्थविश्वातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारी सविस्तर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.