माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
ठेवण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने देशभरात ७ दिवसांचा शोक जाहीर केला आहे