संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा खून झाल्याची माहिती, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअपवर व्हॉईस नोट पाठवून ही माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर ही व्हॉईस नोट त्यांनी माध्यमांसमोर ऐकवून देखील दाखवली.