परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची परभणी संदर्भातील चर्चा झाली. त्यावेळी काही मागण्या प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यासमोर मांडल्या