सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे बीडमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवार गटाचे आमदार तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतलं यावरुन मोठा वादंग उठला आहे. या प्रकरणी आता स्वतः प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.