नव्या वर्षाच्या स्वागताला अवघे काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जाणार आहे. मात्र हे २०२५ हे नवं वर्ष भारतासाठी कसं असेल? नव्या वर्षात नेमके काय बदल होतील? कोणत्या क्षेत्राला अच्छे दिन येतील याविषयीचा अंदाज ज्योतिषाचार्य उल्हास गुप्ते यांनी वर्तवला आहे.