संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत आरोप केला होता. त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत
माफी मागणार नाही, असं स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे. त्याचबरोबर विषय भरकटवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.