निवडणुकीत जवळपास १५० मतदारसंघात गडबड झालेली आहे. याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही २० हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आकडेवारीचं गणित मांडताना महायुतीची एकूण संख्या १०७ एवढी होते, असंही म्हटलं आहे.