वारकरी सांप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळू लागली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलं आहे. लोणावळ्यापासून उगम पावलेल्या या नदीत रसायनयुक्त आणि मैलामिश्रित पाणी सोडलं जात आहे. परिणामी आळंदीत हे असे चित्र गेल्या आठ वर्षांपासून पहायला मिळत आहे. मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरु असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हा खेळ सरकार कधी थांबवणार असा प्रश्न नेहमी विचारला जातो, जो आजपर्यंत अनुत्तरित राहिला आहे. या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी