बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शहरात शनिवारी (२९ डिसेंबर) मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने आपल्या वडिलांसाठी न्यायाची मागणी केली आहे. काही गुन्हा नसताना वडिलांची हत्या करण्यात आली. असा प्रसंग कोणावरही येऊ नये, असंही ती म्हणाली.