रुपाली ठोंबरे यांनी एक्सवर (ट्विटर) एक कथित व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि जितेंद्र आव्हाड हे देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी आले होते, असं म्हणत हल्लाबोल केला. दरम्यान, यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी कथित व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात काही सवाल उपस्थित केले आहेत.