Kalyan Violence: मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आलेल्या कल्याण शहरात आता नव्या हिंसाचाराचे प्रकरण समोर आले आहे. कल्याण चिकणघर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शेजाऱ्याने शेजारच्या कुटुंबीयावर केला कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून रॉकेल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याचे समजतेय. दरम्यान, आरोपी चेतन मांडळे याला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत