Pankaja Munde on Prajakta Mali : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेल्यानंतर प्राजक्ताने संताप व्यक्त केला. पत्रकार परिषद घेऊन तिने तिची भूमिका मांडली. तसंच, तिच्यावर चिखलफेक करण्याऱ्यांनी माफी मागावी, असं आवाहनही केलं. तिच्या भूमिकेनंतर तिच्या समर्थनार्थ अनेकजण उतरले आहेत. आता, मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्राजक्ताच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.पंकजा मुंडे म्हणाल्या, “शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेवही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.”