Suresh Dhas Vs Prajakta Mali Controversy: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमक राहिलेले भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना धनंजय मुंडे यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर भाष्य केले. यावेळी त्यांनी काही महिला सेलिब्रिटींची नावे घेतली. ज्यात अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांचाही उल्लेख होता. या उल्लेखानंतर प्राजक्ता माळी यांनीही पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या विधानाचा जोरदार प्रतिकार करत त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. दरम्यान यावर आता माफी मागणार नाही असं म्हणताना सुरेश धस यांनी प्राजक्ताची पत्रकार परिषद कुणाच्या तरी सांगण्यावरून घेतली असावी अशी भूमिका घेतली आहे.