भाजपा आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना काही अभिनेत्रींची नावं घेतली होती. यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं देखील नाव घेण्यात आलं होतं. त्यावरून आता मोठा वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणात प्राजक्ता माळीला पाठिंबा देण्यासाठी आता मराठी कलाकार एकटवले आहेत. सोशल मीडियाद्वारे निषेध केला जात आहे. अभिनेत्री मेघा धाडेने एका व्हिडीओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.