मागील दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका झाल्या.या दीड वर्षाच्या कालावधीत शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात येण्याचे बर्याच वेळा टाळल्याचे पाहण्यास मिळाले.पण 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे अजित पवार यांनी कुटुंबिया सोबत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.यामुळे येत्या काळात शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.त्या सर्व घडामोडी दरम्यान अजित पवार गटाचे हडपसर चे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली.