Prajakta Mali At Beed: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावरून मागील दोन तीन दिवसात प्रचंड गदारोळ माजला आहे. प्राजक्ता माळीने या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली आहे. राज्य महिला आयोगाने सुद्धा याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळीचा बीडमधील सांस्कृतिक कार्यक्रमातील जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. स्वतः प्राजक्ताने आपल्या पत्रकार परिषदेत आपण केवळा एकदा एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंना भेटल्याचं सांगितलं होतं. आता हीच ती भेट आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.