बीड जिल्ह्यात बंदुकांचे परवाने भाजीपाल्यासारखे वाटले गेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आज भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे, अशी विनंती देखील केली.