बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. दरम्यान खंडणीच्या आरोपा प्रकरणी आपण शरण जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी थेट पोलीस प्रशासनालाच सवाल केला आहे.