बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सीयाडीकडे सोपविल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. आता खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अॅक्शनमुळे वाल्मिक कराडला शरण यावं लागलं यासाठी धस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले