Prajakta Mali: सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत वक्तव्य केलं. ज्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसंच महिला आयोगाकडेही तक्रार केली.एवढंच नाही तर रविवारी प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिलं.त्यानंतर सुरेश धस यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. अशातच दिलगिरी व्यक्त केल्याबद्दल प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.