Valmik Karad: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले.वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्याची माहिती वार्यासारखी राज्यात पसरली.त्यानंतर पुण्यातील अखंड मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सीआयडी कार्यालया बाहेर आंदोलन केले.वाल्मिक कराड या आरोपीला व्हीआयपी ट्रिंटमेंट देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.