फरार आरोपी वाल्मिक कराड यांनी आज आपण शरण जात असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ते थेट पुणे सीआयडी कार्यालयात पोहोचले. खंडणी प्रकरणात आपण शरण जात असल्याचं वाल्मिक कराड यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या पुढे काय कारवाई होणार याबाबतची माहिती सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक सागंर आव्हाड यांनी दिली आहे.