Jalgaon मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात वाद झाला. पाळधी गावातील काही गाड्यांची आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर आता या ठिकाणी तणाव पूर्ण शांतता असली तरी, खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी सहा वाजता पर्यंत या ठिकाणी संचार बंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत पोलिसांनी रात्रीच काही संशयिकांना ताब्यात घेतले आहे.