गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे तर काही आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. तसेच खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. याबाबत रामदास आठवले यांनी आज भाष्य केलं आहे. “बीड जिल्ह्या शांत ठेवायचा असेल तर वाल्मिक कराडला शिक्षा झाली पाहिजे”, असं रामदास आठवले म्हणाले.