देशभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. एकीकडे सामान्य जनता रस्त्यावर उतरून जल्लोष करत असताना दुसरीकडे नेतेमंडळींनी नववर्षाच्या शुभेच्छांसाठी सोशल मीडियाचा पर्याय निवडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक्सवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.