बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असली, तरी उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत. घटनेला २२ दिवस उलटून देखील आरोपी सापडले नसल्याने नागरिकांनी हे आंदोलन केले आहे. त्यावर पोलिसांनी १० दिवसांच्या आत आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं आहे.