Controversial Video Of CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने वरद तुकाराम कणकी या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याचबरोबर सायबर सेलला आणखी एक संशयित पद्माकर आंबोळकर याची ओळख पटली असून, त्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित मुंबईतील वरळी भागातील आहेत. सायबर सेल त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि इतर संभाव्य संशयितांची चौकशी करत आहे. दरम्यान या प्रकरणात आधीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छेडछाड केलेला आणि अपूर्ण व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने गेल्या आठवड्या १२ सोशल मीडिया युजर्सविरोधात गुन्हा दाखल केला होता.