कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेले राजन साळवी २०२४ च्या विधानसभ निवडणुकीत पराभूत झाले. किरण सामंत यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे एसीबीच्या रडारवर असलेले अन् विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजन साळवी आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच, ते लवकरच पक्ष सोडून इतर पक्षात स्थायिक होणार असल्याच्याही चर्चेला जोर आला होता. परंतु, या सर्व चर्चांवर राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला आहे.