Chandu Chavan Protest: सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण हे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान परिसर व मंत्रालयासमोर आंदोलन करताना दिसत आहेत. गळ्यात पाटी घालून रस्त्यात आम्ही न्यायाची भीक मागतोय असं म्हणत चंदू चव्हाण हे आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत आहेत. यापूर्वी सुद्धा चव्हाण यांनी एका व्हिडिओतून मोदींवर हल्लाबोल करत आम्हा जवानांची किंमत शून्य केलीये असा आरोप केला होता. आता तर थेट मंत्रालयासमोरच ते मंत्री, नेते अगदी पोलिसांना सुद्धा दोष देताना दिसत आहेत.