Mumbai Home Guard Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेत १० वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी आहे. बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहेत. महानगरपालिकेकडून २७७१ होम गार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी पास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह १० जानेवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मग आता या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमार्यादा काय असणार? हेच सविस्तरपणे जाणून घेऊ?