नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत आई वडिलांची मुलानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. काल सकाळी एका घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. लिलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. त्यांचा २५ वर्षीय मुलगा उत्कर्ष डाखोळे याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कबुल केले की त्यानेच त्याच्या आई-वडिलांची हत्या केली. 26 डिसेंबरला त्याने आधी गळा दाबून आईची हत्या केली त्यानंतर वडील घरी आल्यानंतर त्यांना चाकूने मारले, या संदर्भातील माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे