बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराड देखील पोलिसांना शरण आला आहे. तर उर्वरित आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.