Mumbra Marathi Controversy: कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळविक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असे म्हटल्याने त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. त्याच्या माफीचे चित्रीकरण मोबाईल प्रसारित करण्यात आले. तसेच तरुणावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. तर माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या आठ ते १० जणांविरोधात रात्री उशीरा मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे सर्व एका पक्षाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.