उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी पवार कुटुंबातील वाद संपू दे संपू दे असं साकडं विठुरायाकडे घातलं होतं. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं कुटुंब वेगळं आहे. कुटुंबाविषयी माझ्या मनात कधीही अंतर नव्हतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुण्यात त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.