मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळविक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असे म्हटल्याने त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. त्याच्या माफीचे चित्रीकरण मोबाईल प्रसारित करण्यात आले. तसेच तरुणावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. तर माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या आठ ते १० जणांविरोधात रात्री उशीरा मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणी आता त्या तरुणाने मनसेने नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली.