Suresh Dhas On Dhananjay Munde& Walmik Karad : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्याची मागणी सुरूच असून काही राजकीय नेते सातत्याने यासाठी आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत. यामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस यांचाही समावेश असून या घटनेच्या चौकशीचा त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुद्धा भाष्य केलं आहे.