देवेंद्र फडणवीस यांचं आळंदीत टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हातात टाळ घेऊन माऊलींचा गजर केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाबाबत भाष्य केलं. इंद्रायणी स्वच्छतेचे काम सुरू आहे. हे एक दिवसाच काम नाही. गावांच, शहरांच आणि उद्योगांचं पाणी हे नदीत सोडलं जात. ते शुद्ध करून इंद्रायणीत सोडायच आहे. ते काम सुरू केलं आहे. संबंधित गावांना, ग्रामपंचायत, महानगर पालिकांना निधी उपलब्ध करून देत आहोत. ते युद्ध पातळीवर सुरू करू असं आश्वासन ही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.