Devdendra Fadnavis Viral Video: देवेंद्र फडणवीस हे संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमासाठी काल उपस्थित होते. कुठे चुकलो तर समजावून सांगा. कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही. चुकलो तर आमचे कान धरा. संतच आम्हाला समजावून सांगू शकतात. आम्हाला कधीही वाटणार नाही. संत कोण होते आम्हाला सांगणारे. असे ही देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले. यावेळी फडणवीसांना आशीर्वाद देताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप भेट म्हणून देण्यात आला तसेच परिधान करण्याची विनन्ती सुद्धा केली गेली. यावेळी फडणवीसांनी नम्रपणे नकार दिला तसेच जिरेटोपास वंदन केलं.