Supriya Sule: बीडच्या पालकमंत्रिपदाच्या मुद्द्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. “बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही”, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं.आता बीडच्या पालकमंत्रिपदाच्या मुद्द्याबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. तसेच यावेळी “बीड हत्या प्रकरणाची दिल्लीही चर्चा होत आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.