Pimpri-Chinchwad: पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेप्रकरणी तक्रारदार अरुण कापसे यांनी जय गणेश साम्राज्यमधील डॉमिनोज पिझ्झामधून पिझ्झा खरेदी करू नये, असं आवाहन नागरिकांना केलं आहे.अरुण कापसे यांना पिझ्झा खात असताना त्या पिझ्झामधील चाकूच्या तुकड्यामुळे किरकोळ जखम झाली आहे.