Manikrao Kokate: छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सूचक विधान केलं आहे. “ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”, असं मोठं भाष्य कोकाटे यांनी केलं. एवढंच नाही तर छगन भुजबळांचे पक्षाने खूप लाड केले, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.